E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरा
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
महावितरणचे आवाहन
पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल, मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.
वीजग्राहकाचे वार्षिक सरासरी वीजबिल ५०० रुपये असल्यास त्याच्या दुप्पट म्हणजे एक हजार रुपयांची सुरक्षा ठेव असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा ठेवीचे ८५० रुपये जमा असल्यास संबंधित ग्राहकास १५० रुपयांचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम वीजबिलात दरमहा नमूद करण्यात येत आहे.
वीजग्राहकांना माहे एप्रिल, मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत १४ लाख ३९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ३९० कोटी ३८ लाख रुपयांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Related
Articles
भारतीय नेमबाजपटूंची सुवर्ण कामगिरी
11 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
भारतीय नेमबाजपटूंची सुवर्ण कामगिरी
11 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
भारतीय नेमबाजपटूंची सुवर्ण कामगिरी
11 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
भारतीय नेमबाजपटूंची सुवर्ण कामगिरी
11 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य धोक्यात
15 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली